Posts

कविता. शब्दात बांधलेल्या

शब्दात बांधलेल्या स्वप्नांस रंग आला हळूच पावलांनी आसमंतास स्पर्श केला सांगू कशी तुला मी मन हळूच साद घाले ओल्याच पावलांनी घरात रंग आला किनारा म्हणे मला कि सांग कोणते मधूर गीत गाते पण स्वरा बिना ही स्वप्नास रंग आला मन पाखरू उडाले गगनात धूंद झाले हलकेच दिशांना नवीन बोध झाला शब्दात बांधलेल्या स्वप्नांस रंग आला हळूच पावलांनी आसमंतास स्पर्श केला ज्या क्षणात गुंतले मी त्या क्षणास अर्थ आला नव्या दिशां मधूनी उंच आकाश भेद झाला मनास जे मिळाले त्या स्वप्नास अर्थ आला हळूच टोचणाऱ्या शब्दांचा इशारा बंद झाला नवीन मेघ नाद देती नवीन चित्र आले साऱ्या स्वरांचा पिसारा नव्याने फुलून आला शब्दात बांधलेल्या स्वप्नांस रंग आला हळूच पावलांनी आसमंतास स्पर्श केला कोणास ना कळावी अशी नवीन ओढ आहे हळूच क्षणानी चाहुलीस अर्थ आला मनात लपलेल्या भावनांना नवा फुलोरा मिळाला ओठावर हास्यांचा नवा रंग आला खुशीत कितीदा हसून पाहीले मी आज दुःखातही हसताना हसण्यात अर्थ आला शब्दात बांधलेल्या स्वप्नांस रंग आला हळूच पावलांनी आसमंतास स्पर्श केला कोणीतरी अशी ही दिशा देऊन गेले दुःखास ही खुशीच्या धारेनी स्पर्श केला आशा नवीन होती पण नाद जुनाच...

कविता. सांग एक वार मजला

                                                    सांग एक वार मजला सांग एक वार मजला तूज स्पर्शून गेले का ते श्र्वास जीवनाचे हलकेच सांगून गेले जे गीत जीवनाचे सांग एक वार मजला हलकेच जो दिसला तो पिसारा मन पाखराचा तो तूच दिला होता इशारा मनाचा सांग एक वार मजला हळूच शब्दांनी जो समजून घेतला तो इशारा मनाचा तुझ्या क्षणांमध्ये गुंतलाच होता सांग एक वार मजला क्षणातून जो साद घाले तो स्पर्श जीवनाचा मनास तूच हळूच दिला होता सांग एक वार मजला जे शब्द अपूर्ण होते ते पूर्ण संगीत करणारे सूर तुझे होते तू हळूच दिला होता इशारा मनाचा

कविता. हळूच दूर गेला

                                                        हळूच दूर गेला शब्दात सांगताना अर्थ भावनेस आला दूर तो किनारा फक्त दृष्टीस तृप्त करुनी हळूच दूर गेला ज्या कोवळ्या क्षणांचा गंध मनात होता तो वादळा मधूनी क्षणाच्या कवेतून हळूच दूर गेला दुःख कोणत्या क्षणाचे तो क्षण पाखरू बनून उडून गेला भावनाच्या जगातून हळूच दूर गेला मन गुंतले होते ज्या तिमिराशी तो तिमिर आज एक अर्थ शुन्य धारे चा किनारा बनून हळूच दूर गेला गीत ते क्षणांचे पण अर्थ भावनाचे तो मनाचा इशारा जहाजावर विसावून हळूच दूर गेला

कविता. कुठून तरी एखादा गंध

                                                      कुठून तरी एखादा गंध कुठून तरी एखादा गंध मनात दरवळतो शब्दाचा अर्थ मनाला उंच भरारी देतो सहज पणे स्वरांचा अर्थ नवा उलगडत जातो कुठून तरी एखादा गंध स्वरांना समजतो ताला तून तंबोऱ्याचा अर्थ उंच आकाशात स्पर्शन जातो कुठून तरी एखादा गंध आशेतून दिसतो क्षितिजा तून रंगांचा अर्थ नवासा मनास स्पर्शून आनंद देऊन जातो कुठून तरी एखादा गंध विचारामधून बहरतो तारकां मधून आकाशाचा रंग नव्यांने बहरून जातो कुठून तरी एखादा गंध पावलातून समजतो दिशांच्या अर्था मधूनी किरणांचा रुपेरी पडदा अलगत सरकत जातो कुठून तरी एखादा गंध धारातून बरसतो थेंबाच्या रेषा मधूनी आशेचा पाऊस प्रत्येक क्षणास बरसत जातो कुठून तरी एखादा गंध सूरातून संगीत बनून दरवळतो स्वरांच्या ओलाव्या तून मनास स्पर्शून जातो कुठून तरी एखादा गंध आशेतून प्रहारांची ओळख दाखवतो दिशांच्या रंगातून स्वप्नाची दुनिया रचून जातो

कविता. एखाद्या प्रहरातून

                                               एखाद्या प्रहरातून एखाद्या प्रहरातून जीवन कहाणी बनते स्वप्नाच्या दुनियेतून सत्यांची लाट उसळते एखाद्या शब्दाचा अर्थातून वीणा साद वेगळी देते आशेच्या पंखावर मन उंच भरारी घेते एखाद्या स्पर्शातून सत्याची चाहुल मिळते अपुर्ण राहीलेल्या गीतांची मैफल पूर्ण होऊन लखलखते एखाद्या आकांक्षेतून नवीन सुगंधाची कळी दरवळते शब्दांच्या अर्था मधून नवीन पावलांची जादू उमलते एखाद्या आवाजातून नवीन कहाणी बनते अर्थाची रांगोळी गुंफून दिशांना अलगत रुपेरी बनवते एखाद्या लहरी मधून निर्सगाची दिशा समजते दिशांच्या स्पर्शातून सत्याची चाहुल अनोळखी दुवा बनून दिसते एखाद्या पाचोळ्यातून एक धुंद कहाणी बनते स्वप्नाच्या दिशांची धारा चारी दिशातून दरवळते एखाद्या लहरी तून सागराची ओळख बनते बदलत्या ऋतुंची कहाणी मन तृप्त स्वरांनी समजते 

कविता. प्रत्येक शब्दा मधला अर्थ

                                                      प्रत्येक शब्दा मधला अर्थ प्रत्येक शब्दा मधला अर्थ बदलून जातो आकाशाच्या निळ्या रंगाचा अर्थ दिशांना अलगत समजून येतो प्रत्येक स्वरा मधला अर्थ निशाणा साधून जातो संगीताच्या शारदे चा नवीन बहाणा मन बनवून जातो प्रत्येक स्पर्श मधला अर्थ किनारा देवून जातो आशेच्या शोधात किनारा नवीन नभाच्या उंच भरारी ला किनारा देऊन जातो प्रत्येक दिशे मधला अर्थ इशारा साधून जातो ताल धरणाऱ्या वीणे ला मृदूंग साद देऊन जातो प्रत्येक क्षणा मधला अर्थ किनारे परखून जातो संवादातून शब्दांच्या कोडयांना किनारा संवाद देऊन जातो प्रत्येक आवाज मधला अर्थ संवाद समजून जातो संगीताच्या तालावर शृंगार नवासा जाग देऊन जातो प्रत्येक किनाऱ्या मधला अर्थ आसरा परखून जातो शब्दांतून पावलांचा किनारा मनाला जाग देऊन जातो प्रत्येक स्वरा मधला अर्थ स्पर्शून नवे तराने देऊन जातो दिशांत लपलेला एक किनारा मनास आनंद देऊन जातो

कविता. एक कहाणी असते

                                                           एक कहाणी असते इवल्याशा पंखांची एक कहाणी असते पानांच्या पाचोळ्यातून एक उंच भरारी दिसते अलगत स्वरांच्या सप्तरंगी दुनियेतून एक निशाणी बनते प्रश्णाच्या दुव्यातून एक निशाणी दिसते स्वप्नाच्या अर्थातून नवीन रागिनी होते सूरात जीवनाच्या वाटेवर विश्वात एक नवीन कहाणी दिसते उंच झोक्यांना स्वप्नाची एक निशाणी दिसते किरणातून शब्दाची कहानी रंगाची रांगोळी गुंफून हसते नभाच्या स्पर्शातून एक आस मधूरशी येते दिशांना आशात गुंफून समझ निशाणी सात रंगातून देते किनारा अलगत सांगून जातो जीवन नवीन कहाणी बनते आशाच्या रंगातून स्वप्नाची दुनिया देते स्वप्नाच्या अर्थातून नवीन रागिनी बनते प्रश्णाच्या दुव्यातून उत्तरांची निशाणी पावलातून बनते पावलांच्या खुणा मधून वेगळी निशाणी दिसते किरणातून उजेडाची नवीन कहाणी बनते प्रत्येक अर्था मधून नवीन कहाणी बनते आशाच्या रंगातून स्वप्नाची नवी लाट मनात घर बनवते