कविता. प्रत्येक शब्दा मधला अर्थ

                                                      प्रत्येक शब्दा मधला अर्थ
प्रत्येक शब्दा मधला अर्थ बदलून जातो आकाशाच्या निळ्या रंगाचा अर्थ दिशांना अलगत समजून येतो
प्रत्येक स्वरा मधला अर्थ निशाणा साधून जातो संगीताच्या शारदे चा नवीन बहाणा मन बनवून जातो
प्रत्येक स्पर्श मधला अर्थ किनारा देवून जातो आशेच्या शोधात किनारा नवीन नभाच्या उंच भरारी ला किनारा देऊन जातो
प्रत्येक दिशे मधला अर्थ इशारा साधून जातो ताल धरणाऱ्या वीणे ला मृदूंग साद देऊन जातो
प्रत्येक क्षणा मधला अर्थ किनारे परखून जातो संवादातून शब्दांच्या कोडयांना किनारा संवाद देऊन जातो
प्रत्येक आवाज मधला अर्थ संवाद समजून जातो संगीताच्या तालावर शृंगार नवासा जाग देऊन जातो
प्रत्येक किनाऱ्या मधला अर्थ आसरा परखून जातो शब्दांतून पावलांचा किनारा मनाला जाग देऊन जातो
प्रत्येक स्वरा मधला अर्थ स्पर्शून नवे तराने देऊन जातो दिशांत लपलेला एक किनारा मनास आनंद देऊन जातो

Comments

Popular posts from this blog

कविता. कुठून तरी एखादा गंध

कविता. पानांच्या रंगा मधूनी