कविता. एखाद्या प्रहरातून

                                               एखाद्या प्रहरातून
एखाद्या प्रहरातून जीवन कहाणी बनते स्वप्नाच्या दुनियेतून सत्यांची लाट उसळते
एखाद्या शब्दाचा अर्थातून वीणा साद वेगळी देते आशेच्या पंखावर मन उंच भरारी घेते
एखाद्या स्पर्शातून सत्याची चाहुल मिळते अपुर्ण राहीलेल्या गीतांची मैफल पूर्ण होऊन लखलखते
एखाद्या आकांक्षेतून नवीन सुगंधाची कळी दरवळते शब्दांच्या अर्था मधून नवीन पावलांची जादू उमलते
एखाद्या आवाजातून नवीन कहाणी बनते अर्थाची रांगोळी गुंफून दिशांना अलगत रुपेरी बनवते
एखाद्या लहरी मधून निर्सगाची दिशा समजते दिशांच्या स्पर्शातून सत्याची चाहुल अनोळखी दुवा बनून दिसते
एखाद्या पाचोळ्यातून एक धुंद कहाणी बनते स्वप्नाच्या दिशांची धारा चारी दिशातून दरवळते
एखाद्या लहरी तून सागराची ओळख बनते बदलत्या ऋतुंची कहाणी मन तृप्त स्वरांनी समजते 

Comments

Popular posts from this blog

कविता. कुठून तरी एखादा गंध

कविता. प्रत्येक शब्दा मधला अर्थ

कविता. पानांच्या रंगा मधूनी