कविता. एक कहाणी असते

                                                           एक कहाणी असते
इवल्याशा पंखांची एक कहाणी असते पानांच्या पाचोळ्यातून एक उंच भरारी दिसते
अलगत स्वरांच्या सप्तरंगी दुनियेतून एक निशाणी बनते प्रश्णाच्या दुव्यातून एक निशाणी दिसते
स्वप्नाच्या अर्थातून नवीन रागिनी होते सूरात जीवनाच्या वाटेवर विश्वात एक नवीन कहाणी दिसते
उंच झोक्यांना स्वप्नाची एक निशाणी दिसते किरणातून शब्दाची कहानी रंगाची रांगोळी गुंफून हसते
नभाच्या स्पर्शातून एक आस मधूरशी येते दिशांना आशात गुंफून समझ निशाणी सात रंगातून देते
किनारा अलगत सांगून जातो जीवन नवीन कहाणी बनते आशाच्या रंगातून स्वप्नाची दुनिया देते
स्वप्नाच्या अर्थातून नवीन रागिनी बनते प्रश्णाच्या दुव्यातून उत्तरांची निशाणी पावलातून बनते
पावलांच्या खुणा मधून वेगळी निशाणी दिसते किरणातून उजेडाची नवीन कहाणी बनते
प्रत्येक अर्था मधून नवीन कहाणी बनते आशाच्या रंगातून स्वप्नाची नवी लाट मनात घर बनवते

Comments

Popular posts from this blog

कविता. कुठून तरी एखादा गंध

कविता. प्रत्येक शब्दा मधला अर्थ

कविता. पानांच्या रंगा मधूनी