कविता. हळूच दूर गेला

                                                        हळूच दूर गेला
शब्दात सांगताना अर्थ भावनेस आला दूर तो किनारा फक्त दृष्टीस तृप्त करुनी हळूच दूर गेला
ज्या कोवळ्या क्षणांचा गंध मनात होता तो वादळा मधूनी क्षणाच्या कवेतून हळूच दूर गेला
दुःख कोणत्या क्षणाचे तो क्षण पाखरू बनून उडून गेला भावनाच्या जगातून हळूच दूर गेला
मन गुंतले होते ज्या तिमिराशी तो तिमिर आज एक अर्थ शुन्य धारे चा किनारा बनून हळूच दूर गेला
गीत ते क्षणांचे पण अर्थ भावनाचे तो मनाचा इशारा जहाजावर विसावून हळूच दूर गेला

Comments

Popular posts from this blog

कविता. कुठून तरी एखादा गंध

कविता. प्रत्येक शब्दा मधला अर्थ

कविता. पानांच्या रंगा मधूनी