कविता. कुठून तरी एखादा गंध

                                                      कुठून तरी एखादा गंध
कुठून तरी एखादा गंध मनात दरवळतो शब्दाचा अर्थ मनाला उंच भरारी देतो सहज पणे स्वरांचा अर्थ नवा उलगडत जातो
कुठून तरी एखादा गंध स्वरांना समजतो ताला तून तंबोऱ्याचा अर्थ उंच आकाशात स्पर्शन जातो
कुठून तरी एखादा गंध आशेतून दिसतो क्षितिजा तून रंगांचा अर्थ नवासा मनास स्पर्शून आनंद देऊन जातो
कुठून तरी एखादा गंध विचारामधून बहरतो तारकां मधून आकाशाचा रंग नव्यांने बहरून जातो
कुठून तरी एखादा गंध पावलातून समजतो दिशांच्या अर्था मधूनी किरणांचा रुपेरी पडदा अलगत सरकत जातो
कुठून तरी एखादा गंध धारातून बरसतो थेंबाच्या रेषा मधूनी आशेचा पाऊस प्रत्येक क्षणास बरसत जातो
कुठून तरी एखादा गंध सूरातून संगीत बनून दरवळतो स्वरांच्या ओलाव्या तून मनास स्पर्शून जातो
कुठून तरी एखादा गंध आशेतून प्रहारांची ओळख दाखवतो दिशांच्या रंगातून स्वप्नाची दुनिया रचून जातो

Comments

Popular posts from this blog

कविता. प्रत्येक शब्दा मधला अर्थ

कविता. पानांच्या रंगा मधूनी