कविता. शब्दात बांधलेल्या
शब्दात बांधलेल्या स्वप्नांस रंग आला हळूच पावलांनी आसमंतास स्पर्श केला
सांगू कशी तुला मी मन हळूच साद घाले ओल्याच पावलांनी घरात रंग आला
किनारा म्हणे मला कि सांग कोणते मधूर गीत गाते पण स्वरा बिना ही स्वप्नास रंग आला
मन पाखरू उडाले गगनात धूंद झाले हलकेच दिशांना नवीन बोध झाला
शब्दात बांधलेल्या स्वप्नांस रंग आला हळूच पावलांनी आसमंतास स्पर्श केला
ज्या क्षणात गुंतले मी त्या क्षणास अर्थ आला नव्या दिशां मधूनी उंच आकाश भेद झाला
मनास जे मिळाले त्या स्वप्नास अर्थ आला हळूच टोचणाऱ्या शब्दांचा इशारा बंद झाला
नवीन मेघ नाद देती नवीन चित्र आले साऱ्या स्वरांचा पिसारा नव्याने फुलून आला
शब्दात बांधलेल्या स्वप्नांस रंग आला हळूच पावलांनी आसमंतास स्पर्श केला
कोणास ना कळावी अशी नवीन ओढ आहे हळूच क्षणानी चाहुलीस अर्थ आला
मनात लपलेल्या भावनांना नवा फुलोरा मिळाला ओठावर हास्यांचा नवा रंग आला
खुशीत कितीदा हसून पाहीले मी आज दुःखातही हसताना हसण्यात अर्थ आला
शब्दात बांधलेल्या स्वप्नांस रंग आला हळूच पावलांनी आसमंतास स्पर्श केला
कोणीतरी अशी ही दिशा देऊन गेले दुःखास ही खुशीच्या धारेनी स्पर्श केला
आशा नवीन होती पण नाद जुनाच होता जुन्या पुस्तकाने नवा अध्याय केला
प्रत्येक क्षणाला नवीन बोध आला हळूच पावलांनी जुना सोबती नवीन मित्र झाला
Comments
Post a Comment