कविता. पानांच्या रंगा मधूनी
पानांच्या रंगा मधूनी
पानांच्या रंगा मधूनी स्पर्श नवा दरवळतो शब्दाच्या अर्था मधला नवा दुआ लखलखतो
मातीतून उठते गाणे शृंगार नवासा दिसतो अपूर्ण कहाणी मधूनी चंद्र नभात चमकतो
किरणांच्या स्पर्शाला ही मन कातरते हलके शब्दाहून ही अर्थाची नवी रांगोळी लखलखते
पाऊल रुपेरी अलगत नव्या क्षितिजावर दिसते समजलेल्या गणितांना संगीताची परीभाषा बदलते
पाचोळ्या मधूनी एक कळी उमलते मन स्पर्शन जाते दिशांना ज्यातून जीवन कहाणी बनते
मन जिथे बिचकले होते तिथून च भरारी घेते आवाज मधूर वीणेचा पण तलवारीची साद जुळते
शब्दास कोणी रोखावे त्यातून च संगीत नवे घडते अर्थाना समजून गाणे नवी पुकार धरते
क्षणातून बनलेल्या शब्दांची बासूरी आकाश घडवते पाचोळ्या तून उठलेल्या क्षणांना आकाश नव्याने घडवते

Comments
Post a Comment