कविता. सांग एक वार मजला
सांग एक वार मजला सांग एक वार मजला तूज स्पर्शून गेले का ते श्र्वास जीवनाचे हलकेच सांगून गेले जे गीत जीवनाचे सांग एक वार मजला हलकेच जो दिसला तो पिसारा मन पाखराचा तो तूच दिला होता इशारा मनाचा सांग एक वार मजला हळूच शब्दांनी जो समजून घेतला तो इशारा मनाचा तुझ्या क्षणांमध्ये गुंतलाच होता सांग एक वार मजला क्षणातून जो साद घाले तो स्पर्श जीवनाचा मनास तूच हळूच दिला होता सांग एक वार मजला जे शब्द अपूर्ण होते ते पूर्ण संगीत करणारे सूर तुझे होते तू हळूच दिला होता इशारा मनाचा